राज्यातील सरकार स्थिर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:41+5:302021-06-26T04:15:41+5:30

निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय ...

The state government will remain stable | राज्यातील सरकार स्थिर राहणार

राज्यातील सरकार स्थिर राहणार

निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी बुथ कमिटी नियुक्त करावी. प्रत्येक गटात सदस्य नोंदणी वाढविणे गरजेचे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने पक्षवाढीसाठी कार्य करावे. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरुद्ध संघर्ष केला पाहिजे.

यशस्वीतेसाठी लक्ष्मण कांबळे, दिलीप पाटील, इस्माईल लदाफ, उल्हास सूर्यवंशी, महेश चव्हाण, ओम शिंदे, नीलेश माकणीकर, अमर माने, पंकज शिंदे, आदित्य लोभे, नेताजी माने, महादेव चव्हाण, राम सगर, अर्जुन माने, अर्जुन पाटील, पानफुलाताई पाटील, राजकुमार मोरे, राजकुमार चिंचुरे, उद्धव मेकाले, धोंडिराम वाघमारे, सादिक शेख, धम्मानंद काळे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The state government will remain stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.