घनसरगाव येथे ११ हजार वृक्ष लागवडीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:58+5:302021-07-26T04:19:58+5:30

रेणापूर : तालुक्यातील घनसरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने ११ हजार वृक्ष लागवडीचा प्रारंभ सीआरपीएफचे डीआयजीपी संजीव कुमार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात ...

Start of planting 11,000 trees at Ghansargaon | घनसरगाव येथे ११ हजार वृक्ष लागवडीला प्रारंभ

घनसरगाव येथे ११ हजार वृक्ष लागवडीला प्रारंभ

रेणापूर : तालुक्यातील घनसरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने ११ हजार वृक्ष लागवडीचा प्रारंभ सीआरपीएफचे डीआयजीपी संजीव कुमार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याने घनसरगाव ग्रामपंचायत व सरपंच शरद दरेकर यांनी ११ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला. त्यातून ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे, माजी सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, वसंत करमुडे, चंद्रकला इंगोले, बायनाबाई साळवे, श्रीकृष्ण पवार, श्रीकृष्ण मोटेगावकर, सिद्धेश्वर मामडगे, मुन्ना गुर्ले, भूषण संपते, बंटी शिंदे, ॲड. श्रीकांत सूर्यवंशी, भय्या गाडे, ॲड. निवृत्ती जाधव, विनोद काळे, विश्वंभर खटके, ग्रामसेवक गिरी, विस्तार अधिकारी कुमठेकर, काका कापसे, विलास आमनावर, महंमद शेख, शपू शेख, हनुमंत कुलकर्णी, साहेबराव शिंदे यांच्यासह सीआरपीएफचे २०० जवान उपस्थित होते.

230721\49331735-img-20210723-wa0061.jpg

घनसरगाव येथे अकरा हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करताना सी आर पी एफ चे संजीव कुमार सभापती रमेश सोनवणे गटविकास अधिकारी मोहन अभंगे घनसरगाव चे सरपंच शरद दरेकर

Web Title: Start of planting 11,000 trees at Ghansargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.