२५ वर्षांपासून रखडलेल्या नाली कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:23+5:302020-12-07T04:14:23+5:30

ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आमदार फंडातून १० लाख मंजूर झाले. ५०० फुट लांबी व २ फुट ...

Start of drain work which has been stalled for 25 years | २५ वर्षांपासून रखडलेल्या नाली कामास प्रारंभ

२५ वर्षांपासून रखडलेल्या नाली कामास प्रारंभ

ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आमदार फंडातून १० लाख मंजूर झाले. ५०० फुट लांबी व २ फुट रुंदीच्या नाली कामाचा प्रारंभ सरपंच सूर्यकांत सुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष हणमंत बिर्ले, ग्रामपंचायत सदस्य महेश वाघमारे, भगवान भालेराव, मांजरा साखर कारखान्याचे संचालक सूर्यकांत पाटील, सदाशिव थोरात, ग्रामविकास अधिकारी एच.बी. चलमले, चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, युवराज माळी, रामेश्वर वाघमारे, हणमंत पाटील, अंगद पाटील, दयानंद वाघमारे, वीरभद्र झुंजारे, हरिभाऊ माळी, किशन शेळके आदी उपस्थित होते.

नागरिकांत समाधान...

२५ वर्षांपासून सांडपाण्यासाठी नाली नसल्याने रस्त्यावर पाणी साचत होते. त्यामुळे काही वेळेस तंटेही झाले. मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. नालीचे काम सुरु झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

***

Web Title: Start of drain work which has been stalled for 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.