मांजरा धरणातील पाणीसाठी ४३ टक्क्यांवरच स्थिर; आता परतीच्या पावसावर आशा
By हणमंत गायकवाड | Updated: September 7, 2022 17:57 IST2022-09-07T17:56:30+5:302022-09-07T17:57:15+5:30
दोन सप्टेंबरला ४३.०५ टक्के पाणीसाठा झाला असून, आजपर्यंत तो स्थिर आहे.

मांजरा धरणातील पाणीसाठी ४३ टक्क्यांवरच स्थिर; आता परतीच्या पावसावर आशा
लातूर : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असला तरी लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा गेल्या सहा दिवसांपासून स्थिर असून, ४३.०५ टक्क्यांच्या पुढे सरकलेला नाही. १ सप्टेंबर रोजी ४२.९० टक्के जीवंत साठा होता. दोन सप्टेंबरला ४३.०५ टक्के पाणीसाठा झाला असून, आजपर्यंत तो स्थिर आहे. मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४५५.८० मि.मी. पाऊस झाला आहे.
गेल्या २४ तासांमध्ये ०० मि.मी. पाऊस आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झालेली नाही. धरणाची पाणीपातळी ६४९.४१ मीटरवर असून, सध्या एकूण पाणीसाठा १२३.३२० दलघमी आहे. त्यापैकी ७६.१९० दलघमी जीवंत पाणीसाठा आहे. जीवंत पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे. त्यात फक्त ७६.१९० दलघमी पाणीसाठा जीवंत आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणात २८.९०३ दलघमी नवीन पाणीसाठा झाला असल्याची माहिती प्रकल्प शाखा अभियंता सुरज निकम यांनी दिली.