श्रीशैल उटगे यांचा लातुरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:06+5:302020-12-13T04:34:06+5:30

सूक्ष्म खाद्य योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन लातूर : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ...

Srishail Utge felicitated in Latur | श्रीशैल उटगे यांचा लातुरात सत्कार

श्रीशैल उटगे यांचा लातुरात सत्कार

सूक्ष्म खाद्य योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील वैयक्तिक लाभार्थी, शेतकर उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, सहकारी उत्पादक यांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

सपोनि. प्रशांत लोंढे यांचा लातुरात सत्कार

लातूर : येथील गांधी चौक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे व पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव कोहाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विवेक सौताडेकर, सुनील सौताडेकर, कपिल भोसले, बाळासाहेब जाधव, गोविंद जगताप, विरेंद्र सौताडेकर, संतोष सोनवणे यांची उपस्थिती होती.

शुल्काविषयी हरकती, सूचना पाठवाव्यात

लातूर : शासनाने मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम २०१२ पोटकलम १ अन्वये आकर्षक क्रमांकाचे शुल्क वाढविण्यासंदर्भात ३ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्याअनुषंगाने हरकती किंवा सूचना द्यायच्या असल्यास परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या पत्त्यावर पाठविण्यात याव्यात, त्यावर महाराष्ट्र शासन विचार करेल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर यांनी कळविले आहे.

कायदे रद्द करण्यासाठी सोमवारी धरणे आंदोलन

लातूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी सोमवारी गांधी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ॲड. उदय गवारे, ॲड. विजय जाधव, सुधाकर शिंदे, प्रताप भोसले, राजकुमार होळीकर, मोहसीन खान, किरण पवार, युवराज धसवाडीकर, पंकज काटे, ॲड. गोविंद सिरसाठ यांनी केले आहे. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन सुरू असून, त्याला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी लातुरात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ॲड. उदय गवारे यांनी सांगितले.

रोजगार मेळावा

लातूर : कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात रविवारपर्यंत रोजगार मेळावा ऑनलाईन पद्धतीने घेतला जात आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Srishail Utge felicitated in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.