शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

उदगीरातील 'श्रीलंका' धडकनाळ-बोरगावला पडला पुन्हा पुराचा वेढा, ग्रामस्थांनी रात्र जागून काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:02 IST

उदगीर तालुक्यातील लातूर रोड  वगळता सर्व मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन बंद पडले आहेत.

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर ( लातूर) : बुधवारी रात्री पासून सुरू झालेल्या धुवांधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील 'श्रीलंका' म्हणून ओळख असलेल्या धडकनाळ आणि बोरगाव या दोन्ही गावांना पुराचा वेढा पडला आहे. जोरदार पाऊस सुरूच राहून पाण्याची पातळी वाढत गेल्याने बुधवारची रात्र गावकर्‍यांनी जागून काढली. दरम्यान, उदगीर तालुक्यातील लातूर रोड  वगळता सर्व मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन बंद पडले आहेत.

दहा दिवसातच या गावांना दुसऱ्यांदा महापुराचा मोठा फटका बसला आहे. लेंडी नदीची उपनदी असलेल्या नदीला महापूर आल्याने या नदीचे पाणी धडकनाळ आणि बोरगावात शिरले. उदगीर देगलूर बोरगाव रस्त्यावरील पुलावरुन पाणी जात असल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. सकाळपासून पुराचे पाणी वाढत आहे. त्यामुळे गावातील घरांमध्ये पाणी शिरत आहे.  गावकर्‍यांनी वेळीच जनावरे व घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविले आहे.

१० दिवसात दुसऱ्यांदा शिरले गावात पाणी!१८ ऑगस्टला पुराचा महाप्रलय धडकनाळ बोरगावात आला होता. या प्रलयात गावासह गावातील पशुधन, शेतीचे मोठे नुकसान झाले होते. पुराने शेतीतील फक्त  खडे शिल्लक ठेवले होते. पिके व पशुधन पुरात वाहून गेले होते. ४०० हेक्टर जमिनीचे नुकसान व २२० पशुधन वाहून गेले होते. या गावांचे जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे पुन्हा  जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसर्‍यांदा गावात पुराचे पाणी शिरल्याने गावच्या पुनर्वसनाची  मागणी जोर धरत आहे.

माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केली पाहणीमाजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी लंडनचा दौरा करून परत येताच प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूरग्रस्त धडकनाळ -बोरगाव भागातील नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून गावांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर मार्ग वगळता तालुक्यातील सर्व मार्ग बंद!गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे एकमेव लातूर मार्ग सुरू होता. सर्व मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे तालुक्यातील सर्व मार्ग बंद होते.

तिरु, देवर्जनसह सर्व तलाव ओहरफ्लो!तालुक्यातील तिरु व देवर्जन हे दोन मोठे मध्यम प्रकल्प असून, हे दोन्ही प्रकल्प पाण्याने ओसंडून वाहत आहे. शिवाय तालुक्यातील लघु व साठवण तलावही ओसंडून वाहत आहेत. तिरुचे सर्व दरवाजे खुले करण्यात आल्यामुळे तिरु नदीला महापूर आला आहे. तालुक्यातील गावाजवळून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना पूर येवून सर्वच पुलावरून पाणी जात असल्यामुळे तालुक्यातील सर्व मार्ग गुरुवारी बंद होते. गुरुवारी दिवसभर पाण्याची संततधार सुरूच होती. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसfloodपूर