बुधवारपासून विशेष मुंबई- बिदर रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST2021-01-18T04:17:28+5:302021-01-18T04:17:28+5:30
बिदरहून मुंबईकडे आठवड्यातून गुरुवार, शनिवार आणि रविवार, तर मुंबईहून बिदरकडे बुधवार, शुक्रवार व शनिवारी ही गाडी धावणार आहे. २० ...

बुधवारपासून विशेष मुंबई- बिदर रेल्वे
बिदरहून मुंबईकडे आठवड्यातून गुरुवार, शनिवार आणि रविवार, तर मुंबईहून बिदरकडे बुधवार, शुक्रवार व शनिवारी ही गाडी धावणार आहे. २० जानेवारीला विशेष रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री ९ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी लातूर येथे ६.२५ वा., लातूर रोड येथे ७.१० वा., उदगीर येथे ७.३७ वा., तर बिदर येथे सकाळी ९.१० वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासात २१ जानेवारी रोजी ही गाडी बिदर येथून रात्री ७.५० वा. सुटेल. उदगीर येथे ८.४९ मिनिटास, लातूर रोड येथे ९.३० वा., लातूर येथे १०.२५ वा., तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वा. पोहोचेल. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर बंद झालेल्या गाड्या विशेष रेल्वे स्वरूपात पूर्ववत होत आहेत.