सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:22+5:302021-07-09T04:14:22+5:30
इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा लातूर : इनरव्हील क्लब, अहमदपूर शाखेच्या अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. डाॅ. वर्षा भोसले यांनी ...

सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी
इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा
लातूर : इनरव्हील क्लब, अहमदपूर शाखेच्या अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. डाॅ. वर्षा भोसले यांनी अध्यक्ष, तर विजया भुसारे यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला. २०२१-२२ साठीचा हा पदग्रहण सोहळा असून, चामे गार्डन येथे हा पदग्रहण सोहळा झाला. यावेळी इनरव्हीलच्या मावळत्या अध्यक्षा डाॅ. मीनाक्षी करकनाळे यांनी, तर मावळत्या सचिव डाॅ. भाग्यश्री येलमटे यांनी नूतन अध्यक्ष, सचिवांकडे पदभार सोपविला. यावेळी डाॅ. मीनाक्षी करकनाळे, पूजा रेड्डी, मेघना रेड्डी, वैशाली चामे, शीतल मालू, ॲड. सुवर्णा महाजन, अनिता जाजू, आदींची उपस्थिती होती. आशा रोडगे, कलावती भातांब्रे यांनी सूत्रसंचालन केले. अनिता जाजू यांनी आभार मानले.
उजळंबच्या वीज उपकेंद्र परिसरात वृक्षलागवड
लातूर : चाकूर तालुक्यातील उजळंब येथील ३३ केव्ही उपकेंद्रात ३७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. कडूनिंब, वड, पिंपळ, शेवगा, आवळा, चिंच, सीताफळ, करंजी, घोटफळ, जांभूळ, पेरू, आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य दत्ता इंद्राळे, ग्रामसेवक सचिन मुंडे, चंद्रसेन पांचाळ, आदींची उपस्थिती होती.