मध्यम प्रकल्प भरल्याने रबी हंगामात ११२ टक्के पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST2020-12-12T04:35:56+5:302020-12-12T04:35:56+5:30

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने यंदा रबी हंगामाच्या नियोजित क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ...

Sow 112% in Rabi season due to medium project | मध्यम प्रकल्प भरल्याने रबी हंगामात ११२ टक्के पेरा

मध्यम प्रकल्प भरल्याने रबी हंगामात ११२ टक्के पेरा

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने यंदा रबी हंगामाच्या नियोजित क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने १६ हजार ६१० हेक्टरवर रबीचा पेरा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, तो अंदाज चुकला असून प्रत्यक्षात १८ हजार ८७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तालुक्यात ११२ टक्के क्षेत्रावर रबीचा पेरा झाला आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यात रबी हंगामाचे १३ हजार ५०० हेक्टर नियोजित क्षेत्र आहे. परंतु, यंदा त्यात वाढ झाली आहे. मागील वर्षी मोजकाच पाऊस झाल्यामुळे तुरीचा पेरा घटला. त्यामुळे रबी हंगामाच्या नियोजित क्षेत्रात वाढ होऊन १६ हजार ६१० हेक्टरवर रबीचा पेरा होईल, असा अंदाज तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला होता. मंडळ कृषी अधिकारी गाढवे, शिवप्रसाद वलांडे यांनी याबाबत बुधवारी आढावा घेतला. रबीचा पेरा करण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन करण्यात यावे, यासाठी कृषी सहाय्यकांची टीम सज्ज करण्यात आली होती. हरभरा, ज्वारी, करडई, मसूर, वाटाणा यासह विविध पिके घेण्यात आली आहेत.

१३ हजार ५०० हेक्टर नियोजित क्षेत्र...

शिरुर अनंतपाळ तालुक्यात १३ हजार ५०० हेक्टर रबीचे नियोजित क्षेत्र आहे. परंतु, यंदा खरीप हंगामातील तुरीचा पेरा केवळ ३ हजार ८०० हेक्टरवर झाल्याने रबीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. १८ हजार ८७८ हेक्टरवर रबीचा पेरा झाला आहे.

ऑक्टोबरमध्ये अति पाऊस झाल्याने रबीच्या पेरण्या लांबल्या. डिसेंबर महिना सुरू झाला तरीही काही ठिकाणच्या जमिनीतील ओलावा कमी होत नाही. तसेच तण वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे रबीच्या पेरण्या संथ गतीने सुरु होत्या.

हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा...

रबीच्या पेरण्या १८ हजार ८७८ हेक्टर्सवर झाल्या असल्या तरी हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा झाला आहे. १४ हजार ८७८ हेक्टरवर म्हणजे १०५ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. सध्या पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने तालुक्यातील पिके बहरत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Sow 112% in Rabi season due to medium project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.