मुलानेच केली व्यसनी वडिलांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 15:04 IST2019-06-06T15:00:11+5:302019-06-06T15:04:14+5:30
शहरातील संजय नगर येथे व्यसनी वडिलांच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलाने पहारीचे घाव घालून वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मुलानेच केली व्यसनी वडिलांची हत्या
लातूर - शहरातील संजय नगर येथे व्यसनी वडिलांच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलाने पहारीचे घाव घालून वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (5 जून) रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, फिर्यादी बबिता गोविंद वाघमारे (40) या आपल्या कुटुंबासह संजय नगर येथे वास्तव्याला आहेत. दरम्यान, गोविंद नारायण वाघमारे (45) हा आपल्या पत्नीसह मुलाला दारू प्यायल्यानंतर सतत छळत असे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पत्नीला त्यांनी मारहाणही केली होती. आपल्या आईच्या छळामुळे त्रस्त झालेला मुलगा विठ्ठल गोविंद वाघमारे (22) याने बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पहारीचे घाव घालून वडिलांची हत्या केली. घटनेनंतर विठ्ठल हा विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.