रस्त्यावर टाकली माती, दुचाकीस्वार त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:18+5:302020-12-12T04:36:18+5:30
... पन्नगेश्वर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन पानगाव : येथील पन्नगेश्वर शुगर मिल्सच्या १८ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे उपाध्यक्ष ...

रस्त्यावर टाकली माती, दुचाकीस्वार त्रस्त
...
पन्नगेश्वर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन
पानगाव : येथील पन्नगेश्वर शुगर मिल्सच्या १८ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे उपाध्यक्ष किसनराव भंडारे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी कारखान्याचे संचालक वसंतराव दहिफळे, सुरेश लहाने, नवनाथ भोसले, जयप्रकाश हलकुडे, गणेश कराड, सुरेश केंद्रे, मुख्य अभियंता सुभाष कराड, मुख्य शेतकी अधिकारी विश्वंभर शिंदे, रवींद्र लोंढे, कार्यालयीन अधीक्षक शंकर निर्मळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.
...
औश्यात उभारली माणुसकीची भिंत
औसा : येथील युवराज कसबे, सचिन पवार, समीर शिंदे, पवन कांबळे, महेश कसबे आणि शुभम जोगदंड यांनी बसस्थानकात माणुसकीची भिंत उभारली आहे. नको असलेले द्या, हवे असलेले घेऊन जा, असे लिहिले आहे. या ठिकाणी लहान, मोठे आणि महिलांच्या कपड्यांचे असे तीन विभाग करण्यात आले आहे. येथून गरजू कपडे घेऊन जात आहेत. त्यामुळे गरजूंना मदत मिळत आहे.
...
निम्न तेरणाच्या कालव्याला लवकरच पाणी
निलंगा : उस्मानाबाद जिल्ह्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामासाठी डाव्या व उजव्या कालव्याला डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात वरिष्ठांशी चर्चा करुन पाणी सोडण्याची तयारी असल्याची माहिती निम्न तेरणा प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली. या पाण्याचा मदनसुरी, रामतीर्थ, सरवडी, कोकळगाव, बामणी, धानाेरा, मुदगड ए., हाडोळी, नदीहत्तरगा, जेवरी, सांगवी, यलमवाडी, लिंबाळा, भुतमुगळी, पिंपळवाडी जे., भंगार चिंचोली, दादगी, शिंदखेड येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
...