वाढदिवसानिमित्त लातूर येथील निवासस्थानी बोलताना माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर म्हणाल्या, राज्यात तसेच जिल्ह्यात आरोग्य प्रशासन आणि नागरिकांनी कोरोनावर चांगलीच मात केली आहे. बाधितांची संख्या दोन अंकी येत आहे. यावरही आपण यशस्वी मात करु, असा आत्मविश्वास व्यक्त करुन निलंगा तालुक्यासंदर्भात त्या म्हणाल्या, आरोग्य प्रशासनाबरोबर नागरिक, सामाजिक संघटना, पक्ष संघटनेने खूप मोठे सहकार्य केल्यामुळे आपणांस कोरोनावर मात करता येत आहे. लॉकडाऊनमुळे व्यापार अडचणीत आला. सामान्यांनाही मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा. गर्दीच्या ठिकाणे टाळावे. प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. ईश्वर कृपेने तिसरी लाट येऊ नये, अशी प्रार्थना त्यांनी केली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा करू नये, असा आपण संदेश दिला होता. सर्व हितचिंतकांनी त्याचे पालन केल्याने समाधान व्यक्त केले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपविभागीय अधिकारी विकास माने, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिनेश कोल्हे, तहसीलदार गणेश जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष मनोज कोळ्ळे, शरद पेठकर, गजानन देशमुख, तानाजी पाटील, महेश सोळुंके, नाईकनवरे, मुख्याध्यापक दत्ता शाहीर, संतोष बरमदे, नाना आकडे आदी हितचिंतकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.