शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, माझ्या २० एकर शेतीचे आता नदीपात्र झाले हो ! मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:33 IST

मांजरा आणि तेरणा नद्यांचा संगम नेहमीच या परिसरासाठी वरदान ठरला होता. पण, यावर्षी तोच 'वरदान' 'शाप' बनून आला.

- बालाजी थेटेऔराद शहाजनी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील शेतकरी शिवपुत्र आग्रे यांचा आवाज थरथरत होता. त्यांच्या डोळ्यात, गेल्या १५ दिवसांपासून पुराच्या पाण्यात बुडालेल्या २० एकर शेतीचे दुःख स्पष्ट दिसत होते. मुख्यमंत्री समोर असताना, शिवपुत्र आग्रे यांनी हात जोडले आणि म्हणाले, साहेब, तुम्हीच आमचे मायबाप... या संकटातून आमची सुटका करा! त्यांच्या या एका वाक्यात अनेक शेतकऱ्यांचे हृदय तुटण्याचे दुःख व्यक्त झाले.

मांजरा आणि तेरणा नद्यांचा संगम नेहमीच या परिसरासाठी वरदान ठरला होता. पण, यावर्षी तोच 'वरदान' 'शाप' बनून आला. नद्यांनी आपला मार्ग बदलून, शिवपुत्र यांच्या शेतीतून नवा प्रवाह तयार केला. ज्वारी, सोयाबीन, उडीद, ऊस. गेल्या १५ दिवसांपासून ही सर्व पिके पाण्याखाली आहेत. नुसती पिकेच नाही, तर जमिनीचा कसही पुराच्या पाण्यासोबत वाहून गेला. होत्याचे नव्हते झालेले आहे. शिवार पाण्याखाली आहे. कर्नाटकतले पाणी बॅक वॉटर महाराष्ट्रात आले आहे. त्यात या परिसरातील जमीन पाण्याखाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त झालेल्या भावना हृदय पिळवटणाऱ्या होत्या.

शिवपुत्र आग्रे यांच्यासह अमोल बोंडगे, चंद्रकांत बोंडगे आणि रावसाहेब मुळे, उत्तम लासुणे, रामदास खरटमोल, खासीमुल्ल, जलील नाईकवाडे आदी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीही आपली व्यथा मांडली. खरीप तर गेलाच आहे, पण, आता रब्बीची पेरणी कशी करायची? शेतीची जागाच राहिली नाही, असा त्यांचा प्रश्न होता. या प्रश्नात केवळ शेतीची चिंता नव्हती, तर कुटुंबाचे भविष्य आणि उदरनिर्वाहाची भीती होती.

या अस्वस्थ क्षणी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना समजून घेतले. त्यांनी शिवपुत्र आग्रे यांना धीर दिला आणि म्हणाले, मी तुमच्या पाठीशी आहे. ही केवळ एक घोषणा नव्हती, तर संकटात सापडलेल्या एका मोठ्या कुटुंबाला दिलेला आधार होता. त्यांनी तत्काळ मदत आणि नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. तसेच, भविष्यात पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे वचनही दिले.

यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर माजी मंत्री आ. संजय बनसोडे, अभिमन्यू पवार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पण, या भेटीमागचा खरा अर्थ होता, एका शेतकऱ्याचे हृदय, ज्याने आपले दुःख व्यक्त केले आणि त्याला मिळालेला दिलासा. ही गोष्ट फक्त नुकसानीची नाही, तर माणुसकी आणि संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्याची आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's Plea to CM: Land Became Riverbed After Flood

Web Summary : Flood-hit farmer Shivputra Agre lamented land loss to the CM, seeking help. Rivers changed course, devastating crops. The CM assured support and compensation to distressed farmers.
टॅग्स :laturलातूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMarathwadaमराठवाडाfloodपूरRainपाऊस