लसीचा तुटवडाच; शहरातील सर्वच लसीकरण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:08+5:302021-05-23T04:19:08+5:30
जिल्ह्यात ७१ लसीकरण केंद्र असले तरी लस पुरवठा होत नसल्यामुळे ती सर्व चालू नाहीत. ज्या-ज्या केंद्रावर लस उपलब्ध आहे. ...

लसीचा तुटवडाच; शहरातील सर्वच लसीकरण केंद्र बंद
जिल्ह्यात ७१ लसीकरण केंद्र असले तरी लस पुरवठा होत नसल्यामुळे ती सर्व चालू नाहीत. ज्या-ज्या केंद्रावर लस उपलब्ध आहे. त्या-त्या केंद्रावरच लसीकरण करण्यात येत आहे. सध्या कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दूसरा डोस चालू आहे. जिल्ह्याला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन प्रकारच्या लस मिळाल्या. परंतु, त्या मुबलक प्रमाणात मिळाल्या नसल्याने लसीकरणाची मोहिम संथ गतीने सुरू ठेवावी लागत आहे.
शहरात ५७ हजार ८५० व्यक्तींनी घेतली लस...
लातूर शहरात आतापर्यंत ५७ हजार ८५० व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. यातील १९ हजार १७२ जणांनी दूसरा डोस घेतला आहे. दोन्ही मिळून ७७ हजार २२ डोस घेतले आहेत. ११ हजार ६५७ हेल्थ केअर वर्कर, ६ हजार ८९२ फ्रंटलाईन वर्कर, ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधी असलेल्या ६ हजार ९४६ तसेच ६० वर्षांपुढील २७ हजार ७०७, ४५ वर्षांपुढील १९ हजार ८३३ आणि १८ ते ४४ वयोगटात ३ हजार ९८७ जणांनी लस घेतली असल्याचे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.