शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धक्कादायक; जप्त सव्वा कोटींच्या मुद्देमालापैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 7:01 PM

एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून १३ जणांची चाैकशी करण्यात येत आहे

लातूर : एका धाडसत्रात जप्त करण्यात आलेल्या जवळपास सव्वा काेटी रुपयांच्या मुद्देमालापैकी तब्बल ४० लाखांचा गुटख्याची चाेरी केल्याचे समाेर आले. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १३ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चाैकशी सुरु आहे.

पाेलिसांनी सांगितले, १० ऑक्टाेबर २०२१ राेजी अन्नसुरक्षा अधिकाऱ्याचे फिर्यादीवरून एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुरनं. ६३५/२०२१ कलम २७२, २७३, ३२८, ३४ भादंवि, अन्नसुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये ८४ लाख रुपयाचा गुटखा जप्त केला होता. तर एमआयडीसीमध्ये जप्त केलेला मुद्देमाल अधिकचा असल्याने ताे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्यासाठी पाेलिसांनी त्याच ठिकाणी ठवेून गाेदामाला सील करुन ठेवण्यात आला होता. या मुद्देमालाची विल्हेवाट तथा नष्ट करण्यासाठी न्यायालयाचा आदेश आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि अन्नसुरक्षा अधिकारी, त्याचबराेबर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाेदाम उघडले.

यावेळी गाेदामात जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही मुद्देमाल कमी असल्याचे आढळून आले. पोलीस ठाण्याकडे असलेल्या नाेंदीनुसार मुद्देमालाची पाहणी केली असता, ४० लाख १५ हजारांचा मुद्देमाल गाेदामाच्या एका कोपऱ्यातील पत्रा उचकटून चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. याबाबत एमआयडीसी ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकूण १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चाैकशी सुरु आहे. आता त्यांच्याकडून चाेरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुुरु आहे.

अहमदपूरच्या व्यापाऱ्याकडून खरेदी...अहमदपूर येथील एका व्यापाऱ्याकडून चाेरी केलेला बहुतांश मुद्देमाल खरेदी केला जात हाेता, असे चाैकशीत समाेर आले आहे. तेरा जणांच्या टाेळीत तीन महिला, दुकानादार आणि इतरांचा समावेश असून, त्यांची चाैकशी सुरु आहे. या टाेळीतील बहुतांश चाेरटे हे लातूर जिल्ह्यातील असून, उर्वरित काहीजण पंढरपूर आणि पुणे येथील आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर