शिवभोजन थाळी केंद्रचालकांना फरकाच्या रकमेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:33+5:302021-06-29T04:14:33+5:30
प्रतिथाळी ४० रुपये अनुदान प्रतिथाळी ४० रुपये अनुदान केंद्रचालकांना देण्यात येते. ५ रुपये दरात एक थाळी ग्राहकांना दिली जाते. ...

शिवभोजन थाळी केंद्रचालकांना फरकाच्या रकमेची प्रतीक्षा
प्रतिथाळी ४० रुपये अनुदान
प्रतिथाळी ४० रुपये अनुदान केंद्रचालकांना देण्यात येते. ५ रुपये दरात एक थाळी ग्राहकांना दिली जाते. मात्र शासनाकडून लॉकडाऊन काळात मोफत देण्याचे आदेश होते. ५ रुपये शासन केंद्रचालकांना देणार असल्याचे आदेशात नमूद आहे. परंतु, अद्याप फरकाची रक्कम मिळाली नाही. एका थाळीला ४० रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे.
निर्बंध शिथिल झाल्याने थाळींची संख्या घटली
गेल्या १५ दिवसांपासून निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे थाळींची संख्या घटली आहे. जिथे शंभर थाळ्या जात होत्या, तिथे ८०-९० थाळ्यांना मागणी आहे.
निर्बंध उठल्यामुळे शिवभोजन थाळी केंद्रावर येणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत वेळ असल्याने या वेळेमुळेही थाळींची संख्या कमी झाली आहे.
शहरी भागात १७ आणि ग्रामीण भागात ९ असे एकूण २६ केंद्र शिवभोजन केंद्र आहेत. या सर्व केंद्रांना मंजूर थाळीसंख्येपेक्षा दीडपट थाळी देण्याचे निर्देश होते.
जिल्ह्यात २६ शिवभोजन थाळी केंद्र आहेत. यातील एकाचेही अनुदान प्रलंबित नाही. फरकाची रक्कम हा शासनाचा विषय आहे. सर्व शिवभोजन थाळी केंद्रचालकांचे अनुदान अदा करण्यात आले आहे. सध्याही शिवभोजन थाळी केंद्रातून मोफतच थाळी दिली जात आहे. - सदाशिव पडदुणे, जिल्हा पुरवठा अधिकारी
केंद्रचालक म्हणतात,
लॉकडाऊन काळामध्ये दीडपट थाळी देण्याचे निर्देश होते. त्यानुसार दीडशे थाळ्यांचे दररोज वाटप करण्यात आले. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे गोरगरिबांची उपासमार टळली. शासनाने केंद्रचालकांना फरकाची रक्कम द्यावी, अशी विनंती आहे. - अविनाश बट्टेवार
शिवभोजनाचे अनुदान मिळालेले आहे. अनुदान कधीच प्रलंबित राहिलेले नाही. शासनाने लॉकडाऊन काळामध्ये दीडपट थाळी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आम्ही त्याचे वितरण केले. फरकाची रक्कम मात्र येणे आहे. - विशाल कापसे