शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देऊन कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:49+5:302021-05-26T04:20:49+5:30
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री काही निवडक पदाधिका-यांच्याशी संवाद साधला. त्यात येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य यांचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री ...

शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देऊन कार्य करावे
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री काही निवडक पदाधिका-यांच्याशी संवाद साधला. त्यात येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य यांचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ग्रामीण भागातील अडचणी जाणून घेण्यासाठी यावे, अशी इच्छा असतानाही कोरोनामुळे येऊ शकलो नाही. त्यामुळे ऑनलाईन संवाद साधण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करा. सध्याच्या काळात आपल्या भागातील आरोग्य यंत्रणेविषयी काही अडचणी असल्यास त्या पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचवा. त्या सोडविल्या जातील. आपल्या मतदारसंघात असे एक मोठे काम सांगा की त्यातून नागरिकांचा फायदा हाेईल. ते काम हाती घ्या. शंभर टक्के पूर्ण करण्याची माझी हमी राहील.
यावेळी विनोद आर्य यांनी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी डेडिकेटेड हाॅस्पिटल, बालकांसाठी चिल्ड्रन्स केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीबरोबर लसीकरणास गती देण्याची मागणी केली. या भागातील समस्या सोडविण्यासाठी कोविडची लाट ओसरताच शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे आर्य यांनी सांगितले.