शिवसैनिकांनी संकट काळात जनतेला आधार द्यावा- संपर्क प्रमुख संजय मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST2021-07-07T04:25:29+5:302021-07-07T04:25:29+5:30

संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी रेणापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. यावेळी नवनिर्वाचित लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, लातूर शहर ...

Shiv Sainiks should support the people in times of crisis- Liaison Chief Sanjay More | शिवसैनिकांनी संकट काळात जनतेला आधार द्यावा- संपर्क प्रमुख संजय मोरे

शिवसैनिकांनी संकट काळात जनतेला आधार द्यावा- संपर्क प्रमुख संजय मोरे

संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी रेणापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. यावेळी नवनिर्वाचित लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, लातूर शहर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या तथा जिल्हा महिला संघटक सुनीता चाळक, उपजिल्हाप्रमुख सचिन दाणे, लातूर तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर, रेणापूर शहर प्रमुख गणपत कोल्हे यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. उपजिल्हाप्रमुख सचिन दाणे यांनी यावेळी रेणापूर नगरपंचायतची प्रभागनिहाय माहिती संपर्क प्रमुखांना सादर केली. संपर्कप्रमुख मोरे म्हणाले, आगामी नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता बुथ पातळीवर कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यावर भर दिला पाहिजे, हे काम गतीने व्हावे यासाठी पदाधिकारी निवडी लवकर होणे आवश्यक असून, जिल्हा प्रमुखांसोबत चर्चा करून त्या लवकरात लवकर केल्या जाव्यात, असे आदेशही त्यांनी दिले.

प्रारंभी मोरे यांनी रेणुकामातेची पूजा केली. पाऊसपाणी चांगले व्हावे, शेतकरी सुखी राहावा, कोरोना संकटातून लवकर मुक्तता व्हावी, यासाठी रेणुकामातेला साकडे घातले. बैठकीस अनिल फुलारी, बालाजी कागले, सुधाकर गरड, हणमंत जाधव, चांदपाशा शेख, शंकर कसपटे, कपिल चितपल्ले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Shiv Sainiks should support the people in times of crisis- Liaison Chief Sanjay More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.