शिरूर अनंतपाळ तालुक्यात ७९.३३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:23 IST2021-01-16T04:23:05+5:302021-01-16T04:23:05+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ गावांतील ग्रामपंचायतींच्या २०२ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी गर्दी नव्हती. दुपारनंतर सर्वच ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ७९.३३ टक्के मतदान
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ गावांतील ग्रामपंचायतींच्या २०२ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी गर्दी नव्हती. दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. ४४९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर एका- एका मतासाठी उमेदवार, कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.
पांढरवाडी येथील मतदान केंद्र क्र. २ वर केराबाई बाचवाड यांना शारीरिक व्याधीमुळे मतदानासाठी चालत जाणे शक्य नव्हते. त्यांनी सूनबाईच्या विजयासाठी व्हीलचेअरवर बसून मतदान केंद्र गाठत मतदान केले आहे.
३० हजार मतदारांनी हक्क बजावला
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ३७ हजार ९७७ मतदार होते. त्यापैकी १६ हजार १५५ पुरुष आणि १३ हजार ९७५ महिला अशा एकूण ३० हजार १३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ७९.३३ टक्के मतदान झाले. सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.