मुक्त वसाहत योजनेतून ३५० कुटुंबांना निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:21+5:302021-07-09T04:14:21+5:30
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण ...

मुक्त वसाहत योजनेतून ३५० कुटुंबांना निवारा
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत आहे. यातून बेघर कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. तालुक्यातील ३५० घरकुल बांधकामांस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
तालुक्यातील उमरदरा येथे ८०, घोणसी- ३५, बोरगाव- २१, माळहिप्परगा- ८२, मरसांगवी- १२, मंगरुळ- ३, रामपूर तांडा- १७, शिवाजीनगर तांडा- २२, रावणकोळा- ३२, अतनूर- ११, होकर्णा- १५, येलदरा- ९, चेरा- ११ याप्रमाणे एकूण ३५० घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येकी १ लाख २० हजारांचे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे.
या घरकुल बांधकामासाठी अनुदानाची मागणी करण्यात आली असून अनुदान प्राप्त होताच घरकुल बांधकामास सुरुवात करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी सांगितले.