सरपंच सेवा महासंघ जिल्हाध्यक्षपदी शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:41+5:302021-07-08T04:14:41+5:30
लातूर : सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निलंगा तालुक्यातील राठोडाचे सरपंच पंकज शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक ...

सरपंच सेवा महासंघ जिल्हाध्यक्षपदी शेळके
लातूर : सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निलंगा तालुक्यातील राठोडाचे सरपंच पंकज शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, विभागीय अध्यक्ष कल्याण साबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शेळके यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील नावाडे होते. यावेळी शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे, संदीप पुणेकर, पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, शिवाजीराव पाटील, मोहन माळी, अपाराजित मरगणे, किशोर टोंपे, अभय पौळ, संजय पौळ, कुलदीप सत्ताळकर, सरपंच विठ्ठल पाटील, धनंजय भुरके, पुरुषोत्तम वाघमारे, दीपक भास्कर, चेअरमन प्रमोद मरूरे, धनराज पाटील, धनाजी चांदुरे, राहुल बिराजदार, मेघराज पाटील, विवेक पाटील, अभिजित मोरे, विष्णू मोरे, पवन माकणे, महेश पाटे, बालाजी शेळके, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उत्तमराव शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. तिरुपती शिंदे यांनी केले. या निवडीबद्दल पंकज शेळके यांचे अभिनंदन होत आहे.