शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

शरद पवार भाजपला लातूरमध्ये धक्का देणार; माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:14 IST

लातूर जिल्ह्यातील उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाल्याचे समजते.

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर काही मतदारसंघात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवार यांच्याकडून इतर पक्षाच्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच लातूर जिल्ह्यातील उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ११ जुलै रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव हे हाती तुतारी घेतील, अशी माहिती आहे.

सुधाकर भालेराव यांनी लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच म्हणजेच ३ जून रोजी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे असून ११ जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील.

भालेराव यांच्या पक्षांतराचं नेमकं कारण काय?

उदगीर विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांचा विजय झाला होता. ते सध्या महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महायुतीच्या माध्यमातून सामोरे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर उदगीरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असल्याने सुधाकर भालेराव यांना भाजपकडून संधी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भालेराव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदपूरमधील भाजपचे माजी आमदार विनायक पाटील यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता भालेराव हेदेखील त्याच वाटेने जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४laturलातूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस