युवकांना घडविण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:49+5:302021-02-09T04:21:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : चारित्र्यसंपन्न युवक घडविण्याचे दालन राष्ट्रीय छात्र सेना आहे. शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींच्या कलागुणांना वाव दिला ...

युवकांना घडविण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : चारित्र्यसंपन्न युवक घडविण्याचे दालन राष्ट्रीय छात्र सेना आहे. शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींच्या कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे युवक घडविण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे योगदान असल्याचे प्रतिपादन ५३ महा-बीएन एनसीसी लातूरचे कर्नल सुनील अब्राहम यांनी येथे केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना द्वारा एटीसी पाच दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डाॅ. सिद्राम डोंगरगे, कर्नल देवेशभाऊ खंडी, कॅप्टन डाॅ. बाळासाहेब गोडबोले, डाॅ. संजय गवई, सुभेदार मेजर दीपककुमार, लेफ्टनंट आर.जी. महावरकर, लेफ्टनंट डाॅ. अर्चना टाक, जेसीओ करणसिंग, देवराज बिस्वाल, ललिलतसिंग यांची उपस्थिती होती. सुनील अब्राहम म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून एक सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचे काम केले जाते. अभ्यासक्रमातील घटकांचा अभ्यास करून प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
१२८ कॅडेट्सचा सहभाग
या शिबिरामध्ये १२८ कॅडेट्सनी सहभाग नोंदविलेला आहे. यामध्ये ९० सिनिअर डिव्हिजन कॅडेट् तर ३८ सिनिअर विंग कॅडेट आहेत.
या शिबिरात सामान्य ज्ञान, शस्त्र शिक्षा, मानचित्र अध्ययन, प्राथमिक उपचार, मानव शरीररचना, नागरी सुरक्षा, योगासने आदींबाबत माहिती देणार आहेत.