लातूर जिल्ह्यात दाेन दिवसात सात घरफाेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:03+5:302020-12-15T04:36:03+5:30
पाेलिसांनी सांगितले, प्रमाेद प्रकाशराव पाेकर्णा (३०, रा. काळेगाव राेड, अहमदपूर) हे एका लग्न साेहळ्याला गेले हाेते. दरम्यान, घराला कुलूप ...

लातूर जिल्ह्यात दाेन दिवसात सात घरफाेड्या
पाेलिसांनी सांगितले, प्रमाेद प्रकाशराव पाेकर्णा (३०, रा. काळेगाव राेड, अहमदपूर) हे एका लग्न साेहळ्याला गेले हाेते. दरम्यान, घराला कुलूप लावण्याचे विसरले. चाेरट्यांनी घरात प्रवेश करुन, कपाटात ठेवलेले दागिने, साेन्याची मूर्ती आणि राेख रक्कम असा एकूण ३ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमला लंपास केला. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औसा शहरातील प्रकाश नारायणराव गाेमदे (५८, रा. आझाद गल्ली) यांच्यासह गल्लीतील अन्य एकाचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान,कपाटात ठेवलेले साेन्याचे दागिने, राेख रक्कम असा एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद आहे. मुरुड येथील बळवंत हरीभाऊ कणसे (३१, रा. माेदीनगर, मुरुड) यांचे घर फाेडण्यात आले. कपाटात ठेवलेले साेन्याचे दागिने, माेबाइल आणि राेख असा एकूण ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर शिवाजीनगर पाेलीस ठाण्याच्या हद्दित घर आणि टायपरायटिंगचे दुकान फाेडले आहे. अमाेल सुधाकर बालवाड (२६, रा. शंकरवाडी ता. चाकूर) यांचे लातुरातील मेडिकल दुकान फाेडून राेख २५ हजार व इतर साहित्य असा २६ हजारांचा मुद्देमाल पळविला. तर मच्छिंद्र नागेश क्षीरसागर (५१, रा. खाडगाव राेड लातूर) यांचे टायपरायटिंग दुकान चाेरट्यांनी फाेडून तीन मशिन पळविल्या. तर वैशाली भगवानराव पाटील (४३, रा. पांडुरंग नगर, लातूर)यांचे घर फाेडून राेख ९ हजार व साेन्याचे दागिने असा एकणू ४७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिसात गुन्हा नाेंद केला आहे.