म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी ३० खाटांचा स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:22 IST2021-05-25T04:22:28+5:302021-05-25T04:22:28+5:30
म्युकरमायकोसिस या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संस्थेमध्ये स्वतंत्र ३० खाटांचा रुग्ण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. ३१ रुग्णांना म्युकरमायकोसिसचा ...

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी ३० खाटांचा स्वतंत्र कक्ष
म्युकरमायकोसिस या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संस्थेमध्ये स्वतंत्र ३० खाटांचा रुग्ण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. ३१ रुग्णांना म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याचे निदान झाले असून, त्यापैकी २६ रुग्ण या रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी १३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी चार खाटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग राखीव ठेवण्यात आला आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे मुबलक प्रमाणात आहेत.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दोन रुग्ण कक्ष
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे. बालरोग विभागासाठी स्वतंत्र दोन कक्ष प्रस्तावीत करण्यात आले आहेत. त्यापैकी २८ खाटांचा एक बालरोग अतिदक्षता विभाग व ३२ खाटांचा स्वतंत्र बालरोग कक्ष जुन्या रुग्ण कक्षाचे नूतनीकरण करून कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक औषधी, यंत्रसामग्री व उपकरणांची मागणी करण्यात आली आहे. या विभागासाठी १५ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी दिली.