वरिष्ठ महाविद्यालये ऑफलाईनसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:23+5:302021-02-15T04:18:23+5:30
५० टक्के ऑफलाईन आणि ५० टक्के ऑनलाईन या पद्धतीने विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पीजीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग होणार ...

वरिष्ठ महाविद्यालये ऑफलाईनसाठी सज्ज
५० टक्के ऑफलाईन आणि ५० टक्के ऑनलाईन या पद्धतीने विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पीजीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग होणार आहेत. फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. सर्व खबरदारी घेऊन सोमवारपासून वर्ग सुरू होतील.
- प्राचार्य डॉ. माधव गव्हाणे, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर
शासनाच्या नियम व अटींच्या अधीन राहून सोमवारपासून महाविद्यालय सुरू होईल. ८.२० ला बी.ए. पदवीच्या विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले आहे. तर दुपारी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात येतील. त्याचबरोबर ऑनलाईन वर्गही राहतील. विद्यार्थ्यांना तो चाॅईस आहे.
- प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, दयानंद कला महाविद्यालय, लातूर
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जी खबरदारी घेणे आवश्यक आहे, ती सर्व खबरदारी घेऊन महाविद्यालयाचे वर्ग सोमवारी सकाळपासून भरविले जातील. टेम्प्रेचर व ऑक्सिजन तपासणी करून वर्गात प्रवेश दिला जाईल. वर्ग भरविण्यास महाविद्यालय प्रशासन सज्ज आहे.
- प्राचार्य डॉ. अजय पाटील, सुशिलादेवी वरिष्ठ महाविद्यालय लातूर.