ज्येष्ठ नागरिकांनी चौक स्वच्छ करून लावली झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST2021-08-27T04:23:54+5:302021-08-27T04:23:54+5:30

पाच नंबर चौकातील रस्त्याच्या मध्यवर्ती छोट्या दुभाजकावर बसून दररोज गप्पा मारत असतात. पण दुभाजकात बांधकाम साहित्य पडलेले होते. गवत ...

Senior citizens cleaned the square and planted trees | ज्येष्ठ नागरिकांनी चौक स्वच्छ करून लावली झाडे

ज्येष्ठ नागरिकांनी चौक स्वच्छ करून लावली झाडे

पाच नंबर चौकातील रस्त्याच्या मध्यवर्ती छोट्या दुभाजकावर बसून दररोज गप्पा मारत असतात. पण दुभाजकात बांधकाम साहित्य पडलेले होते. गवत वाढले होते. ही जागा स्वच्छ करून तेथे झाडे लावावी असा विचार ज्येष्ठ नागरिकांच्या मनात होता.या विचाराला साथ मिळाली ग्रीन लातूर वक्ष टीमची.त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांसोबत बांधकाम साहित्य बाजूला करून गवत काढले. सर्व जागा स्वच्छ केली. खड्डे करून फुलांची ६० मोठी झाडे लावली आहेत. पाच नंबर चौकातील शोभिवंत झाडांची शेजारी अंदाजे एक ट्रॅक्टर गवत काढून चौक सच्चे केला असून यामुळे चौकाला आता सहभागी आहे झाडांनी ही मोकळा श्वास घेतला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या या कार्याचे कौतुक होत असून यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद,अशा आयाचीत, पूजा जाधव, दयाराम सुडे, कपिल काळे, राहुल माने,ज्ञानोबा फड, विदुला राजमाने, सिद्धेश माने,आकाश चिल्लरगे, राम पवार आदींनी श्रमदान करून उपक्रमात सहभाग नोंदवला.

Web Title: Senior citizens cleaned the square and planted trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.