दिशादर्शक फलकाला झाडाझुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:07+5:302021-06-24T04:15:07+5:30

हाळी हंडरगुळी येथून नांदेड-बिदर हा राज्यमार्ग जातो. या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. तसेच हाळी हंडरगुळी येथे बाजार भरत ...

Scroll down the directional sign | दिशादर्शक फलकाला झाडाझुडपांचा विळखा

दिशादर्शक फलकाला झाडाझुडपांचा विळखा

हाळी हंडरगुळी येथून नांदेड-बिदर हा राज्यमार्ग जातो. या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. तसेच हाळी हंडरगुळी येथे बाजार भरत असल्याने वाहनांची त्यात आणखी भर पडते. प्रवासी, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या बाजूला जागोजागी फलक लावून गावांची नावे, अंतर आदींची माहिती फलकांवर दर्शविण्यात आली आहे; मात्र हाळी हंडरगुळी परिसरात असलेल्या दिशादर्शक फलकांवर झाडांच्या फांद्या, वेली गेलेल्या असल्याने फलक दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे नवीन वाहन चालकांना, प्रवाशांना गावांचा अंदाज येणे अवघड झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे जागोजागी वनस्पती, झाडे यांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Scroll down the directional sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.