शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात शाळांना आले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST

उदगीर : २३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता ९ वी ते १२ वी वर्ग प्रत्यक्ष सुरु झाले असून, ...

उदगीर : २३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता ९ वी ते १२ वी वर्ग प्रत्यक्ष सुरु झाले असून, शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. गुरूवारी ४० दिवस पूर्ण झाले असून, एकाही विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा झाली नाही. सध्याची विद्यार्थ्यांची उपस्थिती दिलासादायक आहे. तर काेराेनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात शाळांना यश आले आहे.

उदगीर तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांची एकूण संख्या ११७ आहे. इयत्ता ९ ते १० वर्गातील विद्यार्थीसंख्या १४ हजार १३२ तर इयत्ता ११ ते १२ वी ची ८ हजार ६४८ आहे. कोरोनानंतर सुरु झालेल्या शाळेत ७२ टक्के विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहे. मागच्या शैक्षणिक वर्षात मार्च पासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लॉकडाऊनचा पर्याय स्विकारला. दरम्यान, दिवाळी नंतर मात्र कोरोना संसर्गाचा धोका हळूहळ कमी होत असल्याचे निदर्शनास येताच शासनाने स्थानिक प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन शाळा कराव्यात, असे आदेश दिले. त्यानुसार शैक्षणिक वर्षात शाळेची पहिली घंटा २३ नोव्हेंबरला वाजली. बघता-बघता या शाळांनी विद्यार्थी उपस्थितीचे ४० दिवस पूर्ण केले आहेत.

धोका टळलेला नाही, काळजी घ्यावी

कोरोनाचा धोका आणखीन टळलेला नाही. एकाही विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा झाली नाही. हे आपल्यासाठी दिलासादायक आहे. मात्र यापुढे खुप सतर्क व जागरूक राहून अध्यापनाचे कार्य करणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर व तापमान तपासणी नियमित करूनच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात यावा. असे उदगीर पं. स. चे गटशिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी, विस्तार अधिकारी संजय सिंदाळकर, केंद्र प्रमुख बालाजी धमनसुरे यांनी सांगीतले.

न घाबरता खबरदारी घ्यावी

उदगीर तालुक्यातील सुरु झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यात यश आले आहे. मात्र यात्र यापुुढील काळात अधिकची खबरदारी घ्यावी लागणार नमस्कार आहे. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रूग्णालयात न घाबरता तपासणी करून घ्यावी. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे म्हणाले.