सरपंच देशमुख, कृषी सहायक साळुंके यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:59+5:302021-05-28T04:15:59+5:30
योग शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी पवार लातूर : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ लातूर जिल्हाध्यक्षपदी संदीप पवार यांची लातूर जिल्हाध्यक्षपदी ...

सरपंच देशमुख, कृषी सहायक साळुंके यांचा सत्कार
योग शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी पवार
लातूर : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ लातूर जिल्हाध्यक्षपदी संदीप पवार यांची लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांतील क्रीडा, युवक व सामाजिक क्षेत्रातील कार्य पाहून ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी, राज्याध्यक्ष डॉ. मनोज नीलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. त्यांच्या या निवडीचे क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे.
जीवन विकास प्रतिष्ठानमध्ये अभिवादन कार्यक्रम
लातूर : जीवन विकास प्रतिष्ठानतर्फे ॲड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालय, सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मूकबधिर विद्यालय व मतिमंद विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक दीपक खांडेकर, सुनिता कुलकर्णी, शिवप्रसाद भंडारे, नीरज अंभोरे, व्यंकट नाडागुडे, मगर, मिटकरी आदी उपस्थित होते.