सरमजामी व्यवस्था ही मानसिक गुलामीला बळ देते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:24+5:302021-02-07T04:18:24+5:30
येथील शिवाजी महाविद्यालयात महिला विकास मंचतर्फे लिंगभाव : सामाजिक की नैसर्गिक? या विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनार पार पडले. त्याप्रसंगी ...

सरमजामी व्यवस्था ही मानसिक गुलामीला बळ देते
येथील शिवाजी महाविद्यालयात महिला विकास मंचतर्फे लिंगभाव : सामाजिक की नैसर्गिक? या विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनार पार पडले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते. यावेळी डॉ.तांबे म्हणाल्या, अर्थरचना, राजकारण, मालमत्ता, संस्कृती, धर्मशिक्षण, जात व धर्म या गोष्टींमुळे भारतीय समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. स्त्री व पुरुष हे भिन्न नसून माणूस म्हणून एकसारखे असतानाही शरीर रचनेवरून आपण भेद करु नये. लिंगभावाचा उपयोग हा समता व समानता निर्माण करण्यासाठी झाल्यास संबंध मानवजात सुखी व संपन्न होईल.
लिंगभाव हा नैसर्गिक? नसून तो इथल्या सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा आणि स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण झाला आहे. त्यामुळे तिला दुय्यम महत्त्व प्राप्त झाले. ही मानसिकता बदलण्यासाठी राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच आजची स्त्री ही निर्भय बनून फिरताना दिसत आहे. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप, सूत्रसंचालन डॉ. उर्मिला शिर्सी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे यांनी करून दिला. आभार डॉ. अनुराधा पाटील यांनी मानले.