पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान मंजूर करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST2021-05-23T04:18:48+5:302021-05-23T04:18:48+5:30
शेतीशी निगडीत असलेला पशुसंवर्धन विभाग महत्वाचा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मोठे योगदान दिलेले आहे. ...

पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान मंजूर करावे
शेतीशी निगडीत असलेला पशुसंवर्धन विभाग महत्वाचा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मोठे योगदान दिलेले आहे. कोरोना बाधित रुग्णांना नियमित शुद्ध दुध व अंडी यासारख्या प्रथिजन्य पदार्थाचा पुरवठा करण्यासाठीही पशुसंवर्धन विभागाने नियमितपणे सेवा बजावलेली आहे. पशुची खबरादरी व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी शेती बांधावर जात आहेत. त्याचबरोबर शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. या दरम्यान सदर अधिकारी व कर्मचारी अनेक व्यक्तींच्या संपर्कात येत असून त्यांना कोरोना होण्याचा धोका आहे. किंबहूना कांही अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाने बाधीतसुद्धा केलेले आहे. वास्तविक पशुवैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ आहे. मात्र या सेवेतील अधिकारी व कर्मचा-यांना शासनाने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शासनाने ही बाब लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान मंजूर करत त्यांना प्राधान्याने कोवीड प्रतिबंधक लस द्यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.