रोटरी क्लब व्होराईजनच्या अध्यक्षपदी संजय गवई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:39+5:302021-07-29T04:20:39+5:30
लातूर : रोटरी क्लब ऑफ लातूर व्होराईजनच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. संजय गवई यांची तर सचिवपदी नीळकंठ स्वामी यांची निवड ...

रोटरी क्लब व्होराईजनच्या अध्यक्षपदी संजय गवई
लातूर : रोटरी क्लब ऑफ लातूर व्होराईजनच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. संजय गवई यांची तर सचिवपदी नीळकंठ स्वामी यांची निवड करण्यात आली. प्रशिक्षक म्हणून प्रा. गुणवंत बिरादार, उपाध्यक्ष विश्वनाथ स्वामी, सहसचिव माधव गोरे, कोषाध्यक्ष बी. पी. सूर्यवंशी, तर डॉ. मल्लिकार्जुन हुलसुरे, सुधीर सातपुते, लक्ष्मीनारायण कडेल, विश्वनाथ स्वामी सावळे, डॉ. विजय राठी, विठ्ठल कावळे, धनंजय राऊत, संगमेश्वर स्वामी, नितीन जगताप, विठ्ठल कावळे, डॉ. गोपीकिशन भराडिया, नितीन जगताप यांच्यावर विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. या क्लबमध्ये बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, नगरसेवक प्रा. राजकुमार जाधव, प्रा. विलास लुटे, प्रा. माधव नायणे, प्रा. रंजिता वाघमारे, प्रतिमा कांबळे, बळीराम केंद्रे, सुनील मांदळे, प्रा. प्रकाश राठोड, धनंजय वराळे, प्रा. विद्या आचार्य, माधव भिसे, मुख्याध्यापक मठपती, डॉ. विजय भामरे, शमशोद्दीन शेख, मनोज वाघमारे आदी नवीन सदस्य झाले आहेत. नूतन कार्यकारिणीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.