विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सॅनिटायझर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:42+5:302021-05-27T04:21:42+5:30
निलंगा येथील केंद्रात लस घेण्यासाठी आलेल्यांना व तेथील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर स्प्रेचे वाटप झाले. तसेच तालुक्यातील दादगी व हाडगा येथेही ...

विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सॅनिटायझर वाटप
निलंगा येथील केंद्रात लस घेण्यासाठी आलेल्यांना व तेथील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर स्प्रेचे वाटप झाले. तसेच तालुक्यातील दादगी व हाडगा येथेही सॅनिटायझर स्प्रे बाॅटलचे वाटप करण्यात आले. दादगी येथे अभय साळुंके म्हणाले, गावातील तरुणांनी कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मास्क, साॅनिटायझर, लसीकरणाबाबत जनजागृती करावी.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे, रोहयो समितीचे अध्यक्ष सुभाष नाईकवाडे, माधवराव पाटील, गिरीश पात्रे, सिध्देश्वर बिराजदार, शकिल पटेल, सागर पाटील, प्रकाश गायकवाड, गणेश पेठकर, विशाल नेलवाडे, शुभम सूर्यवंशी, पवन सुरवसे, सोमनाथ कदम, शरद गायकवाड, तगरखेड्याचे सरपंच रणजित सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिराजदार, हाडग्याचे सरपंच परशुराम वाघमारे, तानाजी डोके, दत्ता जाधव, सत्यवान स्वामी, शिवाजी वाघमारे आदी उपस्थित होते.