महाराणा प्रतापनगर सरपंचपदी संगीता पतंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:21+5:302021-02-10T04:19:21+5:30

अनिल नाचपल्ले यांचा लातुरात सत्कार लातूर : राष्ट्रीय ओबीसी, कर्मचारी, अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले व राज्य समन्वयक ...

Sangeeta Patange as Maharana Pratapnagar Sarpanch | महाराणा प्रतापनगर सरपंचपदी संगीता पतंगे

महाराणा प्रतापनगर सरपंचपदी संगीता पतंगे

अनिल नाचपल्ले यांचा लातुरात सत्कार

लातूर : राष्ट्रीय ओबीसी, कर्मचारी, अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले व राज्य समन्वयक विजयकुमार पिनाटे यांचा लातुरात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य मंगेश सुवर्णकार, विभागीय अध्यक्ष लक्ष्मण दावणकर, हिरालाल पाटील, सचिन मुर्के, दत्तात्रय दापके, सत्यनारायण वडे आदींसह ओबीसी कर्मचारी महासंघाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

प्रभाग १४ मधील रस्त्यांची दुरवस्था

लातूर : शहरातील प्रभाग क्र. १४ मधील सद्‌गुरु नगर कालिकादेवी मंदिराच्या जवळील डॉ. मोरे ते एकता रोड जुना औसा रोड या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पुढील आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी हनुमंत कुलकर्णी, यशपाल मोरे, सुनील जोशी, जगदीश वरटी, सच्चिदानंद कुलकर्णी, ओंकार नाईक, जाधव, गोविंद कमठाणे आदींसह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.

सुंदर माझे कार्यालय अभियान

लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. तसेच तालुकास्तरावरही या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमधील कर्मचारी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

शिवगाण स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

लातूर : भाजपा सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिवगाण स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तीगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदींचा समावेश आहे. वैयक्तिकसाठी ३ ते ७ मिनिटे तर सांघिक संघासाठी ५ ते ८ मिनिटे सादरीकरण आहे. प्राथमिक फेरी दयानंद सभागृह येथे होणार असून, अंतिम फेरी १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन लातूर संयोजक अजय पाटील, तन्मय रोडगे यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन शिबिरात सहभाग

लातूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडच्या वतीने ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शिबीर होत असून, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यशस्वितेसाठी डॉ. भागिरथी गिरी, रमेश माने, मारुती कदम, सतीश सातपुते, सतीश भापकर, सुनील राजुरे, नागेश लोहारे परिश्रम घेत आहेत.

एकनाथ धर्माधिकारी यांचे यश

लातूर : येथील एकनाथ धर्माधिकारी यांनी सीए परीक्षेत यश मिळविले आहे. या यशाबद्दल सीए सचिन शिंदे, चंद्रकांत धर्माधिकारी, वासुदेव धर्माधिकारी, विष्णू माळी, नारायण गिरी, अविनाश माळी आदींनी कौतुक केले आहे. एकनाथ धर्माधिकारी मूळचे औसा येथील रहिवासी असून, त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली

लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे. नवीन हरभरा तसेच तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सोयाबीनला ४ हजारांहूनचा अधिकचा दर मिळत आहे. बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करीत व्यवहार पार पाडले जात आहेत. बाजार समितीत गहू, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, हरभरा आदी शेतमालाची आवक होत आहे.

आधार फाऊंडेशनच्या वतीने जनजागृती मोहीम

लातूर : तालुक्यातील धनेगाव येथील आधार फाऊंडेशनच्या वतीने कोरोना जनजागृती मोहीम राबविली जात आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांबाबत माहितीपत्रके वितरीत केली जात आहेत. तसेच आठवडी बाजार, गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सबाबत जनजागृती केली जात आहे. यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले असून, मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले.

श्री केशवराज विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

लातूर : येथील श्री केशवराज विद्यालयामध्ये विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंतराव देशपांडे, डॉ. मनोज शिरूरे, धनंजय कुलकर्णी, अमरजा कुलकर्णी, महेश कस्तुरे, शिवाजी हेंडगे, विवेक जाधव, कृष्णा माने, मंदार सेलूकर, प्रज्वल घुमाडे, निहारिका माने, श्रीपाद पारेकर, सोनाली व्यवहारे, भक्ती वडारे, तन्वी देशमुख, विनायक ब्याळे, गौरव पंढरपुरे, रविंद्र खोडवे, संतोष बीडकर आदींची उपस्थिती होती.

दयानंद महाविद्यालयात कार्डचे वितरण

लातूर : येथील दयानंद कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गोल्ड कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.पी. गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. दिलीप नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे, प्रा.विलास कोमटवाड, प्रा. महेश जंगापल्ले, अल्फिया तांबोळी, प्रिया शिंदे, साक्षी लोखंडे, प्रा. संजय कुलकर्णी, प्रा. जिगाजी बुद्रुके, प्रा. चंद्रशेखर यादव, प्रा. शैेलश सूर्यवंशी आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

रन फॉर वॉरियर्स मॅरोथॉनचे आयोजन

लातूर : येथील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रन फॉर वॉरियर्स मॅरेथॉन स्पर्धा बुधवारी सकाळी ७.१० वाजता सुरू होणार आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून, मुले व मुली या दोन गटांत ५ कि.मी. अंतरासाठी होणार आहे. स्पर्धेचा समारोप विद्यालयाच्या प्रांगणात होणार असून, विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.

Web Title: Sangeeta Patange as Maharana Pratapnagar Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.