शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तेरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा; पाच कढईसह इतर साहित्य जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: May 18, 2025 11:31 IST

औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा...

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील तेरणा नदीपात्रात महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या हद्दीतील वाळूचा उपसा करणाऱ्यांवर पथकाने छापा मारला. यावेळी पाच लाेखंडी कढईसह इतर साहित्य असा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, वाळू चाेरणारे आरोपी कर्नाटक राज्यात पसार हाेण्यात यशस्वी झाले.

औराद शहाजानी परिसरातून तेरणा नदी वाहते. या नदीपात्रात आजही पाणीसाठा बऱ्यापैकी शिल्लक असून, अवैध वाळू उपसा सुरूच आहे. ही वाळू चाेरट्या मार्गाने वाहतूक करून विक्री केली जात असल्याचे समाेर आले आहे. नदीपात्रात पाणी असल्याने शासकीय वाळू घाटांचा लिलाव अद्याप झालेला नाही. परिणामी, या भागातील महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाळू माफियांचा या भागांत मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. सतत कधी कढई, तर कधी बोटीच्या माध्यमातून वाळूचा उपसा केला जात आहे. या वाळू माफियांनी नदीपात्रात कढईच्या माध्यमातून वाळू काढण्याची शक्कल लढवली असून, माेठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जात आहे. दरम्यान, औराद शहाजानी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांना खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे त्यांनी शनिवारी नदीपात्रात छापा मारला. यावेळी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीपात्रापलीकडचा निम्मा भाग हा कर्नाटक राज्यात येत असल्याने हे वाळू माफिया कर्नाटकात पळून जाण्यात यशस्वी ठरले. नदीपात्रात असलेल्या लोखंडी पाच कढई आणि इतर साहित्य असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात पाच ते सहाजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रं-दिन वाळूचा सुरू आहे उपसा... -नदीपात्राच्या पाण्यातून लोखंडी कढईत टोपले आणि बकेटच्या माध्यमातून वाळूचा उपसा केला जात आहे. कढईत वाळू भरून ती नदीतीरावर आणून ट्रॅक्टरमध्ये भरली जात आहे. या माध्यमातून उपसण्यात आलेली अवैध वाळू अव्वाच्यासव्वा दराने बाजारात विक्री केली जात असल्याचे छाप्यात समाेर आले आहे.

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिसmafiaमाफिया