मूलभूत सुविधांसाठी राज्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:16+5:302021-08-15T04:22:16+5:30
अनेक वर्षांपासून या परिसरात अनेक कुटुंबे राहतात. मात्र, यापूर्वी ‘पालिका हद्दीबाहेरील’ असा मालमत्तेवर उल्लेख करून बांधकाम परवाने प्रलंबित ठेवण्यात ...

मूलभूत सुविधांसाठी राज्यमंत्र्यांना साकडे
अनेक वर्षांपासून या परिसरात अनेक कुटुंबे राहतात. मात्र, यापूर्वी ‘पालिका हद्दीबाहेरील’ असा मालमत्तेवर उल्लेख करून बांधकाम परवाने प्रलंबित ठेवण्यात आले. हद्दवाढीत पालिका हद्दीत समावेश झाल्याची नोंद मालमत्ता नमुना नं. ८ वरून करून देणे, नागरी वसाहतीत पथदिवे चालू करणे देणे, रस्ता व नालींचे काम करणे, नळयोजना उपलब्ध करून देणे, घंटागाडीची व्यवस्था करणे, परिसरातील मतदारांची पालिका मतदार यादीत नोंद घेणे, आदी मागण्यांचे निवेदन राज्यमंत्री संजय बनसोडे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे यांना देण्यात आले. यावेळी संपत कांबळे, हरिबा पिंपळे, सत्यवान भोसले, संदीप कामंत, राजेंद्र रोडेवाड, राम बिरादार, शाम खिडसे, मनोहर येलमेवाड, गुरुलिंग मठपती, ॲड. संजय कपाळे, राजेंद्र भालेराव, साहेबराव सोळंके, आदी उपस्थित होते.