१ नंबरसाठी मोजावे लागणार ५ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:16+5:302020-12-12T04:36:16+5:30
१,९, ९९, १११ ठरले भारी... चॉइस नंबरसाठी लातूर कार्यालयातही वाहनधारकांची वर्दळ असते. अनेक हौसी लाेक शासनाने ठरवून दिलेल्या दराचा ...

१ नंबरसाठी मोजावे लागणार ५ लाख रुपये
१,९, ९९, १११ ठरले भारी...
चॉइस नंबरसाठी लातूर कार्यालयातही वाहनधारकांची वर्दळ असते. अनेक हौसी लाेक शासनाने ठरवून दिलेल्या दराचा भरणा करून अनेकदा ॲडव्हान्स बुकिंग करतात. चारचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी ३ लाख रुपये मोजण्यात आले आहेत. आता त्याच क्रमांकांना ५ लाख लागणार असून दुचाकीला १ लाख मोजावे लागतील. वर्षभरात लातूरला कार्यालयात जवळपास १ कोटीपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. जम्पिंग नंबरसाठी पूर्वी ७ हजार ५०० द्यावे लागत होते आता २५ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
हरकती नोंदवाव्यात...
वाहनांच्या प्रकारानुसार दर निश्चित करण्यात आले असून यावर नागरिकांच्या हरकती, सूचना असतील तर ३० डिसेंबरपर्यंत मांडाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे. पूर्वीच्या दरापेक्षा नवीन दरात जवळपास ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.