जेवण करून परत येईपर्यंत घराचे कुलूप तोडून पळवला लाखाचा ऐवज
By संदीप शिंदे | Updated: August 25, 2022 18:49 IST2022-08-25T18:48:43+5:302022-08-25T18:49:32+5:30
लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे.

जेवण करून परत येईपर्यंत घराचे कुलूप तोडून पळवला लाखाचा ऐवज
लातूर : शहरातील एक नंबर चौकातील साई अपार्टमेंटमध्ये घरी कोणी नसल्याचा फायदा उठवत चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडून १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा नाेंद आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नारायण अंबेकर यांचा मुलगा मावशीकडे जेवण करण्यासाठी मंगळवारी रात्री ९.३० वाजता गेला होता. तो रात्री उशिरा घरी परत आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. चोरांनी कपाटाचे कुलूप तोडून रोख ५० हजार, कानातील झुमके, पोत, मंगळसुत्र, अंगठी, पिंपळपान, बाली असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी फिर्यादी नारायण गंगाधर अंबेकर यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कराड करीत आहेत.