ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:27+5:302021-06-26T04:15:27+5:30
उदगीर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरूवारी सकाळी अखिल भारतीय ...

ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी रास्ता रोको
उदगीर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरूवारी सकाळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.
राज्य सरकारने ओबीसींचे आरक्षण रद्द न करता पूर्ववत चालू ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बालाजी फुले, भरत चामले, सुनील केंद्रे, धनाजीराव मुळे, ज्ञानोबा गोडभरले, धर्मपाल नादरगे, बाळू हुरूसनाळे, चंदू खटके, शिवा रोडगे, मच्छिंद्र कांबळे, विजयकुमार डाके, राजकुमार सोमासे, तुकाराम फुले, बालाजी परगे, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष सुधाकरराव दापकेकर, शरदकुमार तेलगाने, महेश मठपती, राहुल बिरादार, बालाजी सुवर्णकार, विजयकुमार पताळे यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व ओबीसी समाजबांधव सहभागी झाले होते.