शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

वाढत्या तापमानाचा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांच्या जीविवास धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 9:37 PM

आर्द्रता वाढली : अकरा दिवसांत ११ जणांचा मृत्यू

बालाजी थेटे/औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ- उतार होत आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाल्याने हवेत आर्द्रता वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे शरीरातील तापमान सहन करण्याची शक्ती कोलमडत आहे. परिणामी, १ ते ११ एप्रिल या कालावधीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

मार्चपासून ऊन वाढले आहे. शेवटच्या आठवड्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान पोहोचले होते. २८ मार्च रोजी ४१ अंश सेल्सिअस, अशी येथील हवामान केंद्रावर नोंद झाली. १ ते ३ एप्रिल या कालावधीत ४१ ते ४३ अंश सेल्सिअस असे कमाल तापमान राहिले. त्यानंतर ४, ५, ६ एप्रिल रोजी कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दरम्यान, मंगळवारपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. हलका पाऊस झाल्याने आर्द्रता वाढली. १० एप्रिल रोजी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. एकंदरीत, औराद परिसरात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची आतापर्यंतची पहिलीच नोंद आहे.

तापमानातील बदलाचा आरोग्यावर परिणामकमाल तापमानात झपाट्याने बदल होत आहे. परिणामी, १ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत परिसरातील ११ ज्येष्ठ नागरिक दगावले आहेत. त्यात विठ्ठल लक्ष्मण शिंगे (९०, रा. माने जवळगा), सोपान यादव गाडे (९२), शेषाबाई शिवराज ऐनापुरे (६०), त्र्यंबकप्पा खंडाळे (७५), कल्याणी महादाप्पा पंचाक्षरी (१०१), रत्नाबाई शंकर गायकवाड (९०), सुभद्राबाई निवृत्ती गायकवाड (७५) (सर्व जण रा. औराद शहाजानी), गंगाबाई मोहनराव मुळजे (७५), शिवाजी दिगंबर डावरगावे (५२), काशीनाथ संतराम बिरादार (७२), रुक्मिणबाई गोविंद शिंगे (८५) (रा. तगरखेडा) यांचा समावेश आहे.

४३ अंश सेल्सिअसपर्यंत सहनशक्तीशरीराची तापमान सहनशीलता ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यापेक्षा अधिक तापमान झाल्यास ते शरीरास सहन होत नाही. तेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत जाते आणि अशक्त व्यक्तींना अधिक त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी सातत्याने पाणी प्यावे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान शेतकऱ्यांनी कामे करू नयेत. सावलीचा आधार घ्यावा. डोक्यास पांढरा गमजा वापरावा. -डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

तापमान वाढल्याने शरीरातील पाणी कमी...तापमान अचानकपणे कमी- जास्त झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊन मृत्यूही ओढवू शकतो.-डॉ. सुनील पोतदार, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलlaturलातूर