जिल्हा आरोग्य विभागाकडून केळगावच्या उपकेंद्राचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:22 IST2021-05-25T04:22:39+5:302021-05-25T04:22:39+5:30
केळगाव येथील उपकेंद्र दोन महिन्यांपासून बंद असून गोळ्या औषधी कचऱ्यात टाकल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत ...

जिल्हा आरोग्य विभागाकडून केळगावच्या उपकेंद्राचा आढावा
केळगाव येथील उपकेंद्र दोन महिन्यांपासून बंद असून गोळ्या औषधी कचऱ्यात टाकल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, जिल्हा परिषदेचे डॉ. टी. एस. कापसे, अंबुलगा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर रोडे यांनी उपकेंद्राची पाहणी केली. दरम्यान, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनीही भेट दिली. यावेळी चेअरमन दगडू सोळंके, सरपंच कांबळे, उपसरपंच सुधाकर चव्हाण, दीपक पाटील, शिवाजी राठोड यांची उपस्थिती होती.
शासनाची लाखो रुपयांची औषधे कचऱ्यात पडल्याने कोणावर आणि कधी कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी माहिती देण्यास टाळले.
डीएचओंकडे अहवाल...
आम्ही प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली असून त्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. सदरील उपकेंद्र सुरु करण्यासाठी लवकरच डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम यांनी सांगितले.