सेवानिवृत्त अशोक मुंढे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:02+5:302021-07-10T04:15:02+5:30
... हुतात्मा कृष्णकांत कुलकर्णी यांना अभिवादन उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात बुधवारी हुतात्मा कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांना स्मृतिदिनानिमित्त ...

सेवानिवृत्त अशोक मुंढे यांचा सत्कार
...
हुतात्मा कृष्णकांत कुलकर्णी यांना अभिवादन
उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात बुधवारी हुतात्मा कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कोविड योद्धा म्हणून नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर व त्यांच्या पत्नी सारिका धाराशिवकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राजेय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, अनिता मुळखेडे, अनिता यलमटे, सुलक्षणा गंगथडे, गुरुदत्त महामुनी, संतोष कोेले, नीता मोरे, लालासाहेब गुळभिले आदी उपस्थित होते.
...
उजनी आरोग्य केंद्रात वृक्षारोपण
उजनी : औसा तालुक्यातील उजनी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच युवराज गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवणनाथ देवणीकर, ग्रामपंचायत सदस्य मजहर पठाण, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शेखर चव्हाण, संजय रंदवे, अमरनाथ महाराज बुवा, गुणवंत कागे आदी उपस्थित होते.
...