राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:31+5:302021-02-08T04:17:31+5:30
इंधन संरक्षण जनजागृती कार्यशाळा लातूर : पेट्रोलियम संरक्षण अनुसंसाधन संघ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत सक्षम २०२१ अंतर्गत ...

राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेचा निकाल
इंधन संरक्षण जनजागृती कार्यशाळा
लातूर : पेट्रोलियम संरक्षण अनुसंसाधन संघ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत सक्षम २०२१ अंतर्गत इंधन संरक्षण जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्राचार्य हर्षद राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केदार खमितकर यांनी ऊर्जा व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने ‘हरित आणि स्वच्छ ऊर्जा’ या बद्दल जनजागृती करण्यासाठी संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन केले आहे. ही मोहीम १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, महिनाभरात देशभरातील या मोहिमेमध्ये सायकलट्रॉन, शेतकरी कार्यशाळा, चर्चासत्रे, चित्रकला स्पर्धा, सीएनजी वाहन इत्यादी विविध उपक्रमांचा समावेश असेल. यामुळे जनतेत स्वच्छ इंधन वापरण्याच्या फायद्याची जागरुकता पसरविली जाईल.
सरपंचपदी पद्मिन सोदले; उपसरपंचपदी किशोर घार
लातूर : लातूर तालुक्यातील कव्हा येथे सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यात सरपंचपदी पद्मिन सोदले तर उपसरपंचपदी किशोर घार यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून सदाशिव सारगे, नेताजी मस्के, नामदेव मोमले, अनिता घोडके, कांचन होळकर, नाजिमा पठाण, पूजा मामडगे, पूनम सारगे, शिवशरण थंबा यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई कव्हेकर, गोविंद घार, अजितसिंह पाटील कव्हेकर, गोविंद सोदले यांनी सत्कार केला.
बसवेश्वर महाविद्यालयात रमाई आंबेडकर जयंती साजरी
लातूर : बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग मार्फत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे उपस्थित होते. मंचावर डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. संजय गवई, सुमनबाई गोदाम, श्रीराम सिंघम यांची उपस्थिती होती. यावेळी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राहुल गोदाम यांनी माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक श्रीराम सिंघम यांनी, तर सूत्रसंचालन रेशमा पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी राम पाटील, योगिराज माकणे, शुभम बिराजदार यांनी परिश्रम घेतले.
रासपच्या अध्यक्षपदी ॲड. प्रकाश भुरे
लातूर : राष्ट्रीय समाज पक्ष लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्षपदी ॲड. प्रकाश भुरे यांची रेणापूर येथे झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रासप मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे होते. या बैठकीत पक्षाच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक रामराव रोडे, शेवाळे, संतोष हाके, भास्कर भंडारे, भरत मोटे, ॲड. कल्पेश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
लायन्स क्लबची विभागीय परिषद
लातूर : आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबची विभागीय परिषद नुकतीच लातुरात संपन्न झाली. यावेळी लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीला आदर्श उपक्रमशील शाखा म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. लॉकडाऊन काळात किचन गार्डन हा अभिनव उपक्रम राबविला होता. याची सविस्तर माहिती अनिल पुरी यांनी दिली. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, लायन्सचे प्रांतपाल विवेक अभ्यंकर, दिलीप मोदी, डॉ. मन्मथ भातांब्रे, लक्ष्मीकांत कालिया यांची उपस्थिती होती.