रहिवासी लातूरचे, लायसन्स काढले परदेशाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:12+5:302021-07-09T04:14:12+5:30

परदेशात गेल्यावर तिथे वाहन चालविण्यासाठी जो परवाना काढावा लागतो, त्यासाठी आपल्याकडील वाहन परवाना आवश्यक असतो. याच परवान्याच्या आधारावर तिथे ...

Residents of Latur, licensed abroad | रहिवासी लातूरचे, लायसन्स काढले परदेशाचे

रहिवासी लातूरचे, लायसन्स काढले परदेशाचे

परदेशात गेल्यावर तिथे वाहन चालविण्यासाठी जो परवाना काढावा लागतो, त्यासाठी आपल्याकडील वाहन परवाना आवश्यक असतो. याच परवान्याच्या आधारावर तिथे परवाना दिला जातो. इथे वाहन चालविण्याचे काम करणारे अनेकजण परदेशात जाताना इथला वाहन परवाना घेऊन जातात. जिल्ह्यात २०१५, २०१६ व २०१७ मध्ये वाहन परवाना घेणाऱ्यांची संख्या ४० च्या घरात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर झाल्याने मागील दोन वर्षांपासून संख्या कमी झाली आहे. तुम्हालाही परदेशात जायचे असेल अन् तिथे वाहन चालविण्याची हौस भागवून घ्यायची असेल तर परदेशी वाहन परवाना इथून आपल्याच जिल्ह्यातून काढणे आवश्यक आहे.

एक वर्षांचीच असते मुदत...

परिवहन कार्यालयातून देण्यात येणारे इंटरनॅशनल लायसन्स एकदा काढल्यावर त्याची मुदत एक वर्षांची असते. कोणत्याही कारणासाठी गेलेल्या व्यक्तीला वर्षांच्या मुदतीचाच परवाना दिला जातो. शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी जाणारे कायमस्वरूपी तेथील रहिवासी होत नाहीत. त्यामुळे वर्षभरानंतर परत आल्यावर लायसन्स पडताळणी करून घ्यावे लागते. इथे काढलेला परदेशी वाहन परवाना संबंधित देशात दाखविला की, याच परवान्याच्या आधारावर तिथे लायसन्स दिले जाते.

तुम्हालाही काढायचेय का लायसन्स...

जर तुम्हालाही परदेशात वाहन चालविण्यासाठी लायसन्स काढायचे असेल तर पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र, विजा, ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्रे घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयात जा. त्याठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसमक्ष तुमची स्वाक्षरी घेतली जाईल. नोकरी, शिक्षण, व्यवसाय कशासाठी जायचे आहे,याची प्राथमिक चौकशी केली जाते. अर्ज केल्यावर २४ तासात परवाना दिला जातो.

पर्यटन, नोकरी, व्यवसायासाठी परदेशात जाणारे नागरिक परदेशी वाहन परवाना काढून घेतात. २०२३ पासून आजपर्यंत २३३ जणांनी परवाना काढला आहे. कोरानामुळे दोन वर्षांपासून संख्या कमी झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केल्यास २४ तासात संबंधित व्यक्तींना परवाना दिाला जातो. - अमर पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर

२०१३- २२

२०१४- २५

२०१५- ४०

२०१६- ३७

२०१७- ४५

२०१८- २१

२०१९- २४

२०२०- १४

२०२१ (जून)- ५

Web Title: Residents of Latur, licensed abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.