लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:40+5:302021-07-08T04:14:40+5:30
लिंगायत महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महासंघाचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ जट्टे, पटणे, धीरज माकणे, अहमदपूर तालुकाध्यक्ष ...

लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात यावे
लिंगायत महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महासंघाचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ जट्टे, पटणे, धीरज माकणे, अहमदपूर तालुकाध्यक्ष महेश भिंगोले, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, लातूर शहर युवक अध्यक्ष विजय खिंडे, विजयकुमार हंडरगुळे, बालाजी गंदगे, संजय बोळेगावे, रामेगावे, सुगावकर, उपाध्यक्ष वाडकर, सांगवे गुरुजी, सिद्धेवर पाटील तीर्थवाडीकर, योगीराज स्वामी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. बिरादार म्हणाले, लिंगायत समाज हा कोणत्याही पक्षात अथवा संघटनांत काम करीत असला, तरी आम्ही सर्वजण एक आहोत. आमच्या समाजाने सर्व पक्षांना मदत केली. पण, राज्यकर्त्यांनी आम्हाला सन्मान दिला नाही. यापुढे लिंगायत समाजाला सन्मान न देणा-या राज्यकर्त्यांना समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. लिंगायत समाजाच्या प्रश्नाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. प्रास्ताविक सुभाष शंकर यांनी केले. आभार धुप्पे यांनी मानले.