पाशा पटेल यांनी शिवीगाळ केल्याची पत्रकाराची जिल्हाधिका-यांकडे  तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 02:05 IST2017-09-17T02:05:35+5:302017-09-17T02:05:39+5:30

राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकारास शिवीगाळ केल्याची तक्रार शनिवारी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे़

Report to the District Collector - Pasha Patel | पाशा पटेल यांनी शिवीगाळ केल्याची पत्रकाराची जिल्हाधिका-यांकडे  तक्रार

पाशा पटेल यांनी शिवीगाळ केल्याची पत्रकाराची जिल्हाधिका-यांकडे  तक्रार

लातूर : राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकारास शिवीगाळ केल्याची तक्रार शनिवारी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे़
विष्णू बोरगे असे या पत्रकाराचे नाव आहे. पाशा पटेल यांनी विश्रामगृहावर पत्रपरिषद आयोजित केली होती़ त्यावेळी पटेल यांनी अर्वाच्च भाषा वापरली व शिवीगाळ केली़ त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बोरगे यांनी निवेदनात केली आहे़
याबाबत पाशा पटेल यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मी त्या पत्रकारास ओळखत नाही़ पत्रकार परिषदेपूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा प्रकार घडला आहे़ पत्रपरिषदेत काहीही झालेले नाही़ संबंधिताकडून बैठकीत माझा अपमान केला गेला़ मी त्याच्या वडिलांच्या वयाचा आहे.

Web Title: Report to the District Collector - Pasha Patel

टॅग्स :crimeगुन्हे