पीक नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:03+5:302021-07-28T04:21:03+5:30
या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमीच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ...

पीक नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना द्यावी
या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमीच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. तसेच फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना देखील वेगाचा वारा व गारपीट याकरिता वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते. जुलै महिन्यात जोरदार पाऊस तसेच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाले आहे. भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती ७२ तासांमध्ये प्राधान्याने क्रॉप इन्शुरन्स मोबाइल ॲपद्वारे द्यावी. ॲपद्वारे दिलेल्या अर्जाची पुष्टी करून संबंधित शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे आय.डी. मिळेल ज्याद्वारे शेतकऱ्यांना अर्जाची सद्यस्थिती ॲपद्वारेच पाहता येईल, असे कृषी सहायक पी. बी. गिरी यांनी सांगितले.