रेणापूर पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST2021-09-16T04:25:40+5:302021-09-16T04:25:40+5:30

भाजपच्या ताब्यात असलेल्या रेणापुर पंचायत समितीच्या सभापती विरोधात १ सप्टेंबर रोजी भाजपच्या आठ पैकी सहा सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ...

Renapur Panchayat Samiti chairperson's resignation approved | रेणापूर पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा मंजूर

रेणापूर पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा मंजूर

भाजपच्या ताब्यात असलेल्या रेणापुर पंचायत समितीच्या सभापती विरोधात १ सप्टेंबर रोजी भाजपच्या आठ पैकी सहा सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन उपविभागीय अधिकारी यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करून १५ सप्टेंबर रोजी दुपारी विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र, रेणापूर पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे यांनी ९ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला होता तो राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी मंजूर केला आहे.

रेणापूर पंचायत समितीत आठ गणामधून भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्यात पहिले अडीच वर्षे सर्वसाधारणसाठी सभापतीपद आरक्षित होते. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर सभापतीपद हे अनुसूचित जातीच्या सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आले होते. सभापतींनी विशेष सभेच्या अगोदरच जि.प. अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला. जि.प. अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर करुन अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे. पीठासीन अधिकारी यांना सहाय्यक म्हणून तहसिलदार राहुल पाटील, गट विकास अधिकारी मोहन अभंगे उपस्थित होते.

Web Title: Renapur Panchayat Samiti chairperson's resignation approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.