शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

रेणापुरात आठ दिवसांत ६० मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

रेणापूर तालुक्यात ५४ हजार हेक्टर क्षेत्र असून, यापैकी ४८ हजार ७०० हेक्टर हे पेरणीयोग्य आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे ...

रेणापूर तालुक्यात ५४ हजार हेक्टर क्षेत्र असून, यापैकी ४८ हजार ७०० हेक्टर हे पेरणीयोग्य आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे ५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. त्यामुळे प्रत्यक्षात ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. पेरणीसाठी लागणारे साहित्य व खत, बी-बियाणे घेऊन शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. तालुक्यातील रेणापूर, पानगाव, कारेपूर, पळशी, पोहरेगाव या पाच मंडळांमध्ये आतापर्यंत ३०१ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात रेणापूर महसूल मंडळांमध्ये ६८ मिलिमीटर, कारेपूर महसूल मंडळांमध्ये ७० मिलिमीटर, पळशी महसूल मंडळांमध्ये ६८ मिलिमीटर, पोहरेगाव महसूल मंडळांमध्ये ६४ मिलिमीटर तर सर्वाधिक कमी पानगाव महसूल मंडळांमध्ये फक्त ३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकूण सरासरी तालुक्यामध्ये ६०.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्यक्षात पेरणीसाठी मोसमी ७५ ते १०० मिलिमीटर पावसाची आवश्यकता लागते.

७५ ते १०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करावी...

रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमीत कमी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरीराम नागरगोजे यांनी केले आहे.